हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ३०) करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सजणार आहे. ‘अंबा माता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बँडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने हा अनोखा लोकोत्सव कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे. न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे नगरप्रदक्षिणेवेळी देवीचे भव्य स्वागत होणार असून, श्री अंबाबाईचे २१ फुटांचे मुखकमल व श्री तिरुपती बालाजीचे मुख कमळ साकारले जाणार आहे.