भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातातील जखमींमध्ये १२ जणांपैकी ९ विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी एमपीएससीची तयारी करणारे असून त्यांची उद्या परीक्षा होणार आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च सरकारच्या माध्यमातून करण्याची घोषणा देखील करण्यात आल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली.