सांगलीच्या कुपवाड मध्ये प्रकाश नगर येथे राहुल सूर्यवंशी वय (३८) याचा रॉडने मारून आणि दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. राहुल सूर्यवंशी हा नात्यातील एका मुलीची वारंवार छेड काढत होता. त्याला वारंवार समजावून सांगून सुद्धा तो ऐकत नसून छेडछाड करत असल्यामुळे,
संतप्त झालेल्या नातेवाईकाने राहुलला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी सौरभ सावंत (वय २२) याला ताब्यात घेतला असून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहेत.