एक पत्र लिहिलं, दोन पत्रं लिहिली... नंतर दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो ते समजून घ्या, ऐकून घ्या.
मी म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐकून घेईन पण ऐकणार नाही.
मराठीच्या विषयात तुम्ही तिसरी भाषा लादताय, कुठली त्रिभाषा सूत्र आणलं.
त्रिभाषा सूत्र फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या दुव्यासाठी
आज कोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीतच सगळं होतं. मग मला म्हणाले केंद्रीय शिक्षण धोरण सांगायला लागले. इतर कोणत्याही राज्यात नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणेतली राज्ये विचारत नाहीत.
विनाकारण आणलेला विषय होता
भुसेंना विचारलं मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार कोणती तिसरी भाषा आणणार आहेत?
हिंदी भाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास, हिंदी भाषा नसलेली राज्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम, हिंदीवाले इकडे येतायत. आणि हे म्हणतायत हिंदी शिका, कोणासाठी शिकायचं.
भाषेबद्दल वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही असो श्रेष्ठच असते. एक भाषा उभा करायला खूप परिश्रम लागतात. लिपी उभी करायला प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा उभा राहत नसतात.
अमित शहा म्हणाले इंग्रजी येते त्याला लाज वाटेल. तुम्हाला येत नाही.
इंग्रजांनी सव्वाशे वर्षे राज्य केलं. मराठा साम्राज्य अटकेपर्यंत गेलं, आम्ही मराठी लादली?
हिंदी दोनशे वर्षापूर्वीची भाषा,
कशासाठी आणि काय करायचंय नेमकं, यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का, यासाठी भाषेला डिवचू, महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू
कोणाची माय व्याली त्यांनी पुढे यावं, महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून दाखवावा