छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट झाली. एका हॉटेलमध्ये लग्नाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले होते त्यावेळी एकमेकांना नमस्कार करून काही वेळ एकमेकांशी बोलले. दोन दिवसापूर्वीच दोन्ही नेते एकमेकांवर दंड थोपटून बोलत होते एकमेकांवर आरोप करत होते. आज मात्र एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येऊन एकमेकांना बरोबर गप्पा मारत हसत होते.