पुणेः विधीमंडळात आमदारांनी विधेयकावर, कायद्यावरील चर्चेत सहभाग घेतला पाहिजे. अनेक आमदार पाच वर्षात एकदाही चर्चेत सहभाग घेत नाहीत. आमदार म्हणून मतदारसंघात तुमचा जनसंपर्क चांगला असला तरी विधी मंडळातील चर्चेत तुम्ही किती सहभाग घेता यावरून नागरिकांमध्ये तुमची प्रतिमा निर्माण होते,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.