मला तसं म्हणायचं नव्हतं! कर्जमाफीचा नाद लागलाय म्हणणाऱ्या सहकारमंत्र्यांचा युटर्न, विधानावर दिलं स्पष्टीकरण

Minister Babasaheb Patil : राज्यातल्या लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वादग्रस्त विधान राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं होतं. या विधानावर स्पष्टीकरण देताना आता सहकारमंत्र्यांनी सारवासारव केलीय.
Babasaheb Patil

Babasaheb Patil Explains Statement on Farmers and Loan Waiver

Esakal

Updated on

Babasaheb Patil: शेतकऱ्यांबाबत राज्यातले नेते, मंत्री आणि खुद्द कृषी खात्याचे मंत्रीही संवेदनशील नसल्याचं आतापर्यंत अनेकदा समोर आलंय. कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांबाबत सभागृहात चर्चेवेळी तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेम खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे त्यांना कृषी खात्या ऐवजी क्रीडा खातं सोपवण्यात आलं. आता राज्याचे विद्यमान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त विधान केलंय. राज्यातल्या लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. निवडणुकीच्या काळात राजकारणी काहीही आश्वासनं देतात असं बाबासाहेब पाटील म्हणाले होते. या विधानावरून टीका सुरू होताच आता मंत्री बाबासाहेब पाटील यांनी युटर्न घेतलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com