'...तर तिसऱ्या लाटेची भीती नाही'; राजेश टोपेंना विश्वास

rajesh tope
rajesh topee sakal

मुंबई : महाराष्ट्र सर्वाधिक लसीकरण (Maharashtra vaccination drive) करणारे राज्य ठरले आहे. तरीही कोरोनाचे रुग्ण (corona cases maharashtra) आणि मृत्यूदर (corona death toll maharashtra) बघता वेगाने लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण हा रामबाण उपाय आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी. ३ कोटी लस प्रतिमहिना उपलब्ध झाली, तर तिसऱ्या लाटेची भीती नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) म्हणाले. आज ते विधानसभेत बोलत होते. (maharashtra monsoon assembly session 2021 health minister rajesh tope commented on vaccination)

rajesh tope
राज्य लोकसेवा आयोगातील 15 हजार 515 रिक्त पदे भरण्यास मंजुरी

पहिल्या लाटेत देखील महाराष्ट्रात कोरोनाचे अधिक रुग्ण होते. मात्र, हळूहळू लाट ओसरली आणि रुग्ण देखील कमी झाले. त्या कालावधीत मुंबईसारख्या मोठ्या शहरांना अधिक फटका बसला. पण, काही महिन्यातच दुसरी लाट आली. या लाटेत गाव-खेड्यापर्यंत कोरोनाचे रुग्ण पसरले. तसेच मृत्यूदर देखील वाढला. महाराष्ट्र सरकारने निर्बंध घालून कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

आता देशात तिसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त केली जाते. ही लाट येऊ नये यासाठी राज्य सरकारने आधीच खबरदारी घेतली आहे. राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. मात्र, अद्यापही मुंबईची लोकल सुरू नाही. लोकांना ये-जा करण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी लोकल सुरू करा, अशी लोकांची मागणी आहे. मात्र, या सर्व गोष्टींवर लसीकरण एकमेव उपाय आहे. राज्याच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी लसीकरणाला गती देणे गरजेचे आहे. झपाट्याने रुग्णसंख्या वाढणाऱ्या, सरासरीपेक्षा रुग्णसंख्या कमी असलेल्या अशा जिल्ह्यांची यादी पाहूनच लसीकरण करावे लागेल, असेही टोपे म्हणाले.

देशात केरळनंतर एक टक्क्यापेक्षा कमी लस वाया घालवणारं महाराष्ट्र राज्य आहे. आपण लशी वाया जाणार नाही, याची पुरेपुर काळजी घेत आहोत. मात्र, येत्या काळात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी. केंद्र शासन मदत करत नाही, असे नाही. मात्र, त्यांच्या पुरवठ्यानुसार आपण लसीकरण चालवू शकत नाही. कोरोनाची जास्त रुग्णसंख्या, वाढता मृत्यूदर हे सर्व पाहून लशींच्या बाबतीत महाराष्ट्राला झुकतं माप द्यावं, असेही राजेश टोपे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com