Maharashtra Monsoon Assembly Session: अधिवेशनाच्या आधी महत्त्वाच्या बैठका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon Session of Legislative Assembly
Maharashtra Monsoon Assembly Session: अधिवेशनाच्या आधी महत्त्वाच्या बैठका

Maharashtra Monsoon Assembly Session: अधिवेशनाच्या आधी महत्त्वाच्या बैठका

महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्या म्हणजे १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांचे नेते आज पत्रकार परिषद घेणार असून राज्य मंत्रिमंडळाची बैठकही होणार आहे. (Maharashtra Assembly Monsoon Session)

हेही वाचा: राज्याच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप जाहीर; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे

महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसंच विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद दुपारी ३.३० वाजता होणार आहे. तर संध्याकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

खातेवाटप झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक असणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.

Web Title: Maharashtra Monsoon Assembly Session Starting From 17 August State Cabinet Assembly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..