Maharashtra Monsoon Session 2026
esakal
Maharashtra Monsoon Session 2026 : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. हे अधिवेशन २२ जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १० जुलैपर्यंत चालणाऱ्या या तीन आठवड्यांच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या आणि ज्वलंत विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.