
राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या चहापानाला विरोधक जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विरोधकांकडून नेहमीच या चहापानावर बहिष्कार टाकला जातो. दरम्यान, या अधिवेशनात काही महत्त्वाचे आणि वादग्रस्त विषय गाजण्याची शक्यता आहे. त्यात हिंदी भाषेची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधक उपस्थित करतील. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढू शकते.