हिंदी भाषा पहिलीपासून अभ्यासक्रमात शिकवण्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय. आता याविरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून मनसेनं राज्यातील सर्वच पक्षांसह मराठीजनांना आवाहन केलंय. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या भेटीत चर्चेनंतरही समाधान झालं नसल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. कोणत्याही प्रकारे सरकारकडून जे दाखले दिले गेले ते मान्य नाहीत असं राज ठाकरे स्पष्टपणे बोलले.