Maharashtra Monsoon Update: राज्यात मॉन्सून दाखल झाला असून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्यांमध्ये मॉन्सूनं जोरदार हजेरी लावली आहे. यानंतर उर्वरित महाराष्ट्राला तो टप्प्याटप्प्यानं व्यापून घेणार आहे. दरम्यान, आज मंगळवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत येलो आणि पुण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सुरुवातीला पावसानं तुफान हजेरी लावलेली असली तरी जूनमध्ये पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज 'स्कायमेट' या हवामानाचे अपडेट देणाऱ्या संस्थेनं म्हटलं आहे.