पुणे : यंदा मान्सूनने (Monsoon Update) महाराष्ट्रात वेळेआधीच आगमन केले असून सुरुवातीला अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. काही ठिकाणी तुरळक सरी झाल्या असल्या, तरी सर्वदूर पावसाचा जोर नव्हता. मात्र, आता १३ जूनपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.