esakal | कोकणात अतिवृष्टीचा इशारा; मुंबईत बुधवारी ऑरेंज अलर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall

कोकणात अतिवृष्टीचा इशारा; मुंबईत बुधवारी ऑरेंज अलर्ट

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : येत्या दोन दिवसात राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस (heavy rainfall) कोसळणार असून याचा सर्वाधिक प्रभाव उत्तर कोकणावर (North Konkan) होणार असल्याचा अंदाज आहे. यादरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा ही देण्यात आला आहे. परिणामी मुंबईतही (Mumbai) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने (regional meteorological center) व्यक्त केला आहे.

हेही वाचा: मुंबईतून हाॅंगकाॅंगला औषधांचा पुरवठा; मालवाहू विमानातून 49 टन निर्यात

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा मार्ग पश्चिम ते उत्तर पश्चिम दिशेला राहणार असून त्यामुळे विदर्भ,मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसा ची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात या पावसाचा सर्वाधिक परिणाम उत्तर कोकण भागात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई,ठाणे,पालघर आणि रायगड भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा देखील मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिला आहे.

मुंबईत बुधवारी ऑरेंज अलर्ट

मुंबईत बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज देखील आहे. बुधवारी मुंबईत 'ऑरेंज' तर गुरुवारी 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे.

loading image
go to top