esakal | मुंबईतून हाॅंगकाॅंगला औषधांचा पुरवठा; मालवाहू विमानातून 49 टन निर्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Hong Kong Air Cargo

मुंबईतून हाॅंगकाॅंगला औषधांचा पुरवठा; मालवाहू विमानातून 49 टन निर्यात

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) द्वारे मालवाहतूक (goods transportation) सेवा वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर हाँगकाँग (Hong Kong) एअर कार्गोचे मालवाहू विमान (Airplane) मुंबईत नुकताच दाखल झाले. तर, हाॅंगकाॅंग एअर कार्गोच्या A330-200 मालवाहू विमानाद्वारे वैद्यकीय साहित्य, औषधे व इतर अत्यावश्यक सामग्रीची (essential medical kits) मुंबईतून हाॅंगकाॅंगमध्ये निर्यात (Export) करण्यात आली. या मालवाहू विमानातून एकूण 49 टन सामग्रीची निर्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा: कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूंचा राज्य सरकारने खुलासा करावा- हायकोर्ट

सीएसएमआयए येथे 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1.56 वाजता हाॅंगकाॅंग मालवाहू विमान दाखल झाले. सीएसएमआयएच्या पथकाने या विमानाने दिमाखात स्वागत केले. हाँगकाँग एअर कार्गोच्या A330-200 मालवाहूची एकूण क्षमता 120 मेट्रिक टन आहे. यामध्ये औषधे, हातमोजे, कोरोनाच्या लसी व इतर वैद्यकीय उपकरांची निर्यात केली. या सामग्रीचे एकूण वजन एकूण ४९ टन होते. त्यानंतच याचदिवशी सीएसएमआयए येथून दुपारी ४.३३ वाजता हे मालवाहू विमान हाँगकाॅंगला निघाले. सध्या हाँगकाँग एअर कार्गाेची मालवाहतूक सेवा ही एक नियोजित विमान कंपनी आहे. दर आठवड्यातून एकदा सीएसएमआयए येथे येऊन मालवाहतूक करेल.

जून ते ऑगस्ट दरम्यान, सीएसएमआयएने 18 हजार 900 उड्डाणांद्वारे संचालित करून 1 लाख 87 हजार टनापेक्षा जास्त हवाई मालवाहतूक केली. यामधील 25 हजार टन मालवाहतूकीत औषधी वस्तू, वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे. मागील महिन्यात मुंबई विमानतळाने 25 हजार टन आंतरराष्ट्रीय निर्यात मालवाहतूक हाताळली. कोरोनाच्या एकूण 5 कोटी 70 लाख लसीचा पुरवठा देशात आणि जगातील एकूण 121 ठिकाणी पुरवठा केला आहे.

loading image
go to top