

Nashik Municipal Election Results 2026
esakal
Nashik Election Results 2026: नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (१६ जानेवारी २०२६) सकाळपासून सुरू झाली असून, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. गुरुवारी (१५ जानेवारी) झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी केंद्रांवर गर्दी झाली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये अनेक प्रभागांमध्ये स्पष्ट चित्र समोर येत आहे, तर काही ठिकाणी चुरस कायम आहे. मतमोजणीतील पहिल्या कलांनुसार भाजप १४, शिंदेंची शिवसेना १०, राष्ट्रवादी अजित पवार ०३,ठाकरेंची शिवसेना ०३,काँग्रेस ०४ तर मनसे २ जागांवर आणि आरपीआय ०२ जागांवर आघाडीवर आहे.