Maharashtra’s new sports policy aims for “One District One Sport”
sakal
महाराष्ट्र क्रीडा : राज्यात एकाच खेळाच्या अनेक संघटना आहे. यांच्यामध्ये वाद उद्भवत असून याचा मोठा फटका राज्यातील खेळाडूंना बसतो. तसेच, ‘एक राज्य, एक क्रीडा संघटना’ या तत्त्वामुळे केंद्रीय संघटनेकडून राज्यातील अनेक संघटनांची संलग्नता रद्द केली जाते. भविष्यात असे वाद होऊ नयेत म्हणून राज्यात ‘एक जिल्हा, एक खेळ, एक संघटना’ या तत्त्वावर संघटनांना मान्यता देण्यात येणार आहे. राज्य शासनातर्फे नवे क्रीडा धोरण आखण्यात येत असून याचा समावेश या धोरणात राहणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी (ता.११) विधानपरिषदेत दिली.