राज्यातील 49 पोलिसांना राष्ट्रपती व पोलिस पदके 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बुधवारी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती पदके जाहीर झाली. देशभरातील 795 जणांची या पदकासाठी निवड करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील 49 पोलिसांचा समावेश आहे. 

राज्यातील सात पोलिसांना पोलिस शौर्य पदक, तिघांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक; तर 39 अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदके जाहीर झाली आहेत. 

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्यांमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष शाखा) एस. जगन्नाथन, सहायक पोलिस आयुक्त (ठाणे) बाजीराव भोसले व पोलिस उपनिरीक्षक (नंदुरबार) विनायक राजपूत यांचा समावेश आहे. 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर झालेल्या यादीत उपायुक्त ज्ञानेश्‍वर चव्हाण, ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक महेश पाटील, पोलिस नियंत्रण कक्षातील निरीक्षक बाळासाहेब घाडगे, कुलाब्यातील पोलिस निरीक्षक श्‍याम शिंदे, पोलिस निरीक्षक पांडुरंग शिंदे, पोलिस निरीक्षक सायरस इराणी, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वाघ यांचा समावेश आहे.

Web Title: maharashtra news 49 police President medals police medals