भाजपने हाती फक्त स्वप्ने ठेवली - चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

उस्मानाबाद - केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अनेक वल्गना करणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हातावर फक्त स्वप्ने ठेवण्याचे काम केले असून, २०१९ मध्ये अशा थापा मारणारे सरकार चालणार नाही, हे सांगण्याची वेळ आली असून, त्यासाठी जनतेने पेटून उठले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने मराठवाडा विभागातील जनआक्रोश सभा रविवारी येथे पार पडली. त्या वेळी चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, की एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. नोटबंदी, जीएसटीमुळे सर्वसामान्य व व्यापारी त्रस्त आहेत.

‘हे तर फसणवीस सरकार’
जनतेची फसवणूक करणारे फडणवीसांचे सरकार हे फसणवीस सरकार आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. युनियन बॅंकेने सहा लाख ४८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर एक लाख ३४ हजार शेतकरी पात्र असल्याचे सांगितले, म्हणजे पाच लाख लाभार्थी बोगस होते का, असा प्रश्‍न चव्हाण यांनी उपस्थित केला.

Web Title: maharashtra news ashok chavan bjp congress osmanabad