भाजपच्या परतीचा प्रवास सुरू - अशोक चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई - आक्रस्ताळी व खोट्या प्रचाराला जनता कंटाळलेली असून, नांदेड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसलेला फटका हा भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाल्याची नांदी आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टोला लगावला आहे. 

नांदेड महानगरपालिका निवडणुकीतल्या दणदणीत यशानंतर अशोक चव्हाण यांनी राजीव गांधी भवन मध्ये अयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नांदेडच्या जनतेने कॉंग्रेसच्या सुसंस्कृत, संयमी भूमिकेवर पुन्हा शिक्‍कामोर्तब केले. भारतीय जनता पक्षाने खोटा प्रचार केला. व्यक्‍तिगत पातळीवर जाऊन चुकीच्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी देखील भाषा वापरल्याचे वाईट वाटते अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्‍त केली. सत्तेची सर्व शक्‍ती भाजपने वापरली तसेच धार्मिक ध्रुवीकरण करण्याचाही अटोकाट प्रयत्न केला. पण, अच्छे दिन हवे असतील, तर कॉंग्रेसलाच विजयी करायला हवे यासाठी जनतेने कौल दिला आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. राज्यात शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, जीएसटी, नोटबंदी या सरकारच्या फसव्या धोरणांना जनतेने दिलेली ही चपराक असून, केंद्र व राज्यातल्या भाजप सरकारच्या वरील विश्‍वास उडाल्याने आता नांदेडमधूनच भाजपच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याचे चव्हाण म्हणाले. भाजपच्या नेत्यांनी टोकाचा आक्रमकपणा घेऊनही कॉंग्रेसने संयमीपणाने जनतेचा विश्‍वास संपादन केला आहे. कॉंग्रेस संस्कृतीला जनतेचा मिळालेला हा कौल आगामी निवडणुकांची नांदी असून, आता भाजपने यापुढे यापेक्षाही मोठे पराभव स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

Web Title: maharashtra news ashok chavan congress