शुल्क परतावा विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात नको 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई - आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्काचा सरकारकडून होणारा परतावा थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

या विद्यार्थ्यांच्या एकूण शुल्कापैकी 50 टक्के शुल्क विद्यार्थ्यांकडून आणि उर्वरित रक्कम सरकारच्या तिजोरीतून दिली जाते. सरकारकडून मिळणारी रक्कम महाविद्यालयांच्या खात्यांऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये टाकली जाणार आहे. त्यामुळे ही रक्कम वेळेत महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाला मिळेल का, अशी शंका याचिकेत उपस्थित करण्यात आली आहे. प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून शुल्क घ्यायचे की नाही, याबाबतही संभ्रम आहे, त्यामुळे सरकारने हे सर्व मुद्दे स्पष्ट करण्याची आवश्‍यकता आहे, असे याचिकादारांचे म्हणणे आहे. या याचिकेवर 27 जूनला सुनावणी होणार आहे.

Web Title: maharashtra news bank student