चौकशीनंतर खडसे भाजपच्या मुख्य प्रवाहात - रावसाहेब दानवे 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मुंबई - एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. काही कारणांमुळे त्यांना पदावरून दूर व्हावे लागले होते. त्यांनी स्वतःहून पदाचा त्याग केला. यातील बऱ्याचशा प्रकरणांच्या चौकशीतून ते बाहेर पडले आहेत. त्यातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर त्यांना सन्मानाने पक्ष पूर्णपणे मदत करेल, असे परखड मत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. 

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह एकत्रित व्यासपीठावरून गुरुवारी खडसे यांनी भाजपमध्ये खंत असल्याचे सूतोवाच केले. दानवे म्हणाले, ""मला वाटते ज्यांनी खडसेंच्या तोंडाला कान लावले त्यांनीच त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांना खडसेंबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. खडसेंनी एकेकाळी विधानसभेत कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाभाडे काढले होते, त्यांनीच आरोप करून खडसेंना पदावरून दूर करा, असे सांगितले होते. तेच आता खडसेंबाबत खंत व्यक्त करतात. 

खडसेंची सुरू असलेली चौकशी संपल्यावर ते भाजपच्या मुख्य प्रवाहात सामील होतील.'' चौकशी पूर्ण होण्याबाबत विचारणा केली असता, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया दिली.

Web Title: maharashtra news bjp raosaheb danve eknath khadse