भाजपच्या "स्वबळा'पुढे शिवसेनेचे "निष्ठावंत'! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने "एकला चलो रे'ची तयारी सुरू केलेली असताना शिवसेनाही स्वबळाच्या तयारीला लागली आहे. राज्यात युतीच्या सूत्रात भाजपकडे असलेल्या 26 मतदारसंघांत भाजपविरोधात "निष्ठावंत' शिवसैनिक देण्याची रणनीती आणण्यास शिवसेनेने सुरवात केली आहे. त्यासाठीचे संभाव्य उमेदवार निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अशा "निष्ठावंत' शिवसैनिक नेत्यांना केवळ स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात लक्ष न देता संपूर्ण लोकसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे गोपनीय आदेश दिल्याची माहिती आहे. 

लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना- भाजप युतीचे सूत्र ठरले आहे. त्यात भाजपला 26 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी मिळते, तर शिवसेना युतीतून 22 जागांवर निवडणूक लढली आहे. या 26 मतदारसंघांत भाजपला 2014 मध्ये पहिल्यांदाच मोठे यश मिळाले असून, त्यांचे 23 खासदार आहेत, तर शिवसेनेचे 18 खासदार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत शिवसेनेला आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. त्यामुळे, 2019 मध्ये शिवसेनेशिवाय सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. सध्याची भाजप व शिवसेनेतील राजकीय स्पर्धा पाहता भाजप युती करणार नसल्याची शिवसेना नेत्यांची खात्री आहे. आतापर्यंत भाजपकडे असलेल्या 26 जागांवर शिवसेनेने कधीही उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न केला नसल्याने संपूर्ण लोकसभा मतदारसंघाला परिचित असणाऱ्या "निष्ठावंत' शिवसैनिकांनाच संधी देण्याची राजकीय खेळी शिवसेनेने आखली आहे. यात, संबंधित लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आजी- माजी आमदार, आजी- माजी मंत्री व जिल्हाध्यक्ष यांच्या नावावर विचार सुरू केला आहे. यापैकी अनेक मतदारसंघांतील अशा "निष्ठावंत' नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: maharashtra news bjp shiv sena