विधानसभेतील कॉंग्रेसकडील विरोधी पक्षनेतेपदावर संकट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - विधानसभेत कॉंग्रेसकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावर नारायण राणे यांच्या बंडामुळे संकट येण्याचे संकेत आहेत. विधानसभेतील आमदार नितेश राणे यांनीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. सध्या विधानसभेत कॉंग्रेसचे 42, तर राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत. मात्र नितेश राणे यांनी कॉंग्रेसच्या आमदारपदाचा राजीनामा दिल्यास दोन्ही पक्षांचे संख्याबळ समसमान होऊ शकते. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणत्या पक्षाला द्यायचे यावरून विधिमंडळात राजकीय पेच निर्माण होईल, असे जाणकारांचे मत आहे. 

दरम्यान, कॉंग्रेसचे संख्याबळ एकाने घटल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या कॉंग्रेसकडे संख्याबळ अधिक असले, तरी ते समान झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याची जबाबदारी येईल. दोन्ही पक्षांचे संख्याबळ समान असल्याने विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यावे याबाबतचा निर्णय होईपर्यंत हे पद रिक्‍त राहण्याची शक्‍यताही आहे. 

सध्या नियमाप्रमाणे अपक्ष आमदार अथवा सहयोगी पक्षाच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेता येत नाही. 2014 मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रवादीने विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला होता. मात्र नियमानुसार कॉंग्रेसचे संख्याबळ एकने अधिक असल्याने ते राष्ट्रवादीला मिळाले नाही. 

मात्र दोन्ही पक्षांचे संख्याबळ समसमान झाल्यास एकतर चिठ्ठी टाकून विरोधी पक्षनेते पदाची निवड होण्याची शक्‍यता राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Web Title: maharashtra news congress