राज्यात कॉंग्रेसचा "मेकओव्हर'...! 

शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून पराभूत मानसिकतेत गुरफटलेल्या कॉंग्रेसला गुजरातमधील विधासनभा निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली असून, याच पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रातही "मेकओव्हर' करण्याची तयारी कॉंग्रेसने सुरू केली आहे. 

कॉंग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे राहुल गांधी राज्यातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी पाच प्रादेशिक विभागांत प्रत्येकी दोन दिवस तळ ठोकणार आहे. त्यासाठी राज्यव्यापी संपर्क यात्रा काढण्यात येणार असून, ही यात्रा प्रत्येक जिल्ह्यातून जाणार आहे. राहुल गांधी यांनीच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना अशाप्रकारची यात्रा काढण्याची सूचना केली आहे. 

गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी नवसर्जन यात्रा काढली होती. साठ आसनी बसमधून त्यांनी संपूर्ण गुजरातमध्ये संपर्क अभियान राबवले होते. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही राहुल गांधी अशाच प्रकारच्या बसमधून फिरणार आहेत. जिथे रात्र होईल, तिथे मुक्‍काम असे त्यासाठीचे नियोजन सुरू असल्याचे कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. 

महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, हमीभाव, कर्जमाफी हे कळीचे प्रश्‍न असून, शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष सरकारविरोधी करण्याची तयारी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुरू केली आहे. याशिवाय युवक, महिला व आदिवासी यांच्यासह दलितांचे प्रश्‍न, मराठा व धनगर आरक्षणाचे रेंगाळलेले प्रश्‍न यावर कॉंग्रेसच्या नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

गुजरात निवडणुकांत राहुल गांधी यांची पूर्णत: बदललेली व विश्‍वासार्ह प्रतिमा समोर आली होती. सोशल मीडियाचाही त्यांनी प्रभावी वापर केला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातले प्रश्‍न व त्यांची मांडणी यासाठी विशिष्ट टीम कामाला लागली आहे. 

खासदार, आमदार संपर्कात असल्याचा दावा 
भाजपचे खासदार नाना पटोले यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षातले दोन खासदार व सहा आमदार कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा विश्‍वसनीय सूत्रांनी केला आहे. यामध्ये भाजप व शिवसेना खासदार, आमदारांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. नाराज असलेले विरोधी पक्षातील खासदार, आमदार कोण याबाबत ठोस माहिती देण्यात आली नसली, तरी राज्यातल्या काही वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून या खासदार, आमदारांनी राहुल गांधींशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

Web Title: maharashtra news congress