भाऊ रंगारी ट्रस्टच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. 

मुंबई - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. 

पुण्यात पहिला गणपती कोणी बसवला याबाबत ट्रस्टच्या वतीने याचिका दाखल आहे. बुधवारी त्यावर न्या. अनुप मोहता आणि भारती डांगे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारने जुलै 2016 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे यंदाचे 125 वे वर्ष आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने यंदा गणेशोत्सवाचे विशेष नियोजन करणारे परिपत्रक जुलैमध्ये जारी केले. या दोन्ही निर्णयांना याचिकादारांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास खंडपीठाने नकार दिला. सरकारचा निर्णय 2016 चा आहे. मग आता घाई कशाला करता, असा प्रश्‍न खंडपीठाने उपस्थित केला. तसेच कोणत्याही प्रकारचा अंतरिम दिलासा देण्यासही नकार दिला. प्रतिवादींनी याबाबत माहिती घ्यावी, असे तोंडी निर्देश न्यायालयाने दिले.

Web Title: maharashtra news court Bhau Rangari Trust