अनिकेतच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत - केसरकर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

मुंबई - सांगलीत पोलिस कोठडीत असताना मृत्यू पावलेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांनी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणातील साक्षीदार अमोल भंडारेच्या मागणीनुसार त्याच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहावे यासाठी मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस हे ऍड. उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा करणार असल्याचे केसरकर म्हणाले. 

अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने जनमानस प्रक्षुब्ध झाले आहे. यापार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी सांगलीत जाऊन वरिष्ठ पोलिस अधिकारी, तसेच कोथळे कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली. सांगली दौऱ्यानंतर केसरकर यांनी आज फडणवीस यांना भेटून प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना केसरकर यांनी या प्रकरणाची सीआयाडी चौकशी सुरू असून, चौकशीच्या पलीकडे जाऊन पोलिसांचा हेतू नेमका काय होता, हे शोधून काढले जाईल, असे सांगितले. 

सांगलीच्या प्रकरणात पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला होता. तरीही अनिकेत कोथळेवर चौकशीची पुढील कारवाई करणे गरजेचे होते काय किंवा या चौकशीमागे वेगळा हेतू होता काय? याची चौकशी सीआयाडीमार्फत केली जाईल. कोथळे खून प्रकरणी संशयितांची चौकशी सुरू असून, सीआयाडी परिणामकारकपणे चौकशी करेल. तपासाची आणखी माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा सात दिवसानंतर सांगलीला जाणार असल्याचे गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: maharashtra news Deepak kesarkar 10 lakhs of help to Aniket's family