मुख्यमंत्र्यांकडून दीपावलीच्या शुभेच्छा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

मुंबई - दीपावलीनिमित्त अवतरणारे प्रकाशपर्व समाजमनासाठी चैतन्याचा स्रोत आहे. या पर्वाने यंदा राज्यातील सर्व नागरिकांना आनंद आणि सुख-समृद्धी द्यावी, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ऐतिहासिक कर्जमाफीच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात यंदाचा दीपोत्सव नवा प्रकाश पसरवणारा ठरला आहे, असेही ते म्हणाले.

दीपावलीपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले, की विविध क्षेत्रांतील क्रांतिकारक निर्णयांमुळे राज्यात परिवर्तन घडत आहे. पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने होत असून, देशातील सर्वांत जास्त गुंतवणूकही झाली आहे.

विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नव्या महाराष्ट्राच्या निर्माणाकडे दमदार वाटचाल सुरू झाली आहे. या प्रक्रियेत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. या नवनिर्माणाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

Web Title: maharashtra news devendra fadnavis diwali wishes