धर्मा पाटील यांच्या मुलाने सानुग्रह अनुदान नाकारले 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 80 वर्षीय धर्मा पाटील यांना राज्य सरकारने देऊ केलेले 15 लाखांचे सानुग्रह अनुदान त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी नाकारले आहे. 

मोबदला वाढवून देण्याच्या मागणीवर नरेंद्र पाटील ठाम आहे, म्हणूनच त्याने हे अनुदान नाकारले आहे. याविषयी त्यांनी, जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी आमचा लढा असून, सानुग्रह अनुदानापेक्षा इतर शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे जमिनीला भाव मिळाला, त्याचपद्धतीने किंमत मिळावी अशी मागणी आहे. धर्मा पाटील यांना अनुदान देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केली होती. सानुग्रह अनुदान एक महिन्याच्या आत मिळेल, असे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले होते. दरम्यान, दोंडाईचा सोलर पार्क या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीपैकी 199 हेक्‍टर जमिनीसाठी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

Web Title: maharashtra news dharma patil grants declined