हुकूमशाही सरकारला घालवा - डॉ. पाटणकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मेळाव्यातील ठराव
राज्याचा दुष्काळ कायमचा संपवा 
धरणग्रस्तांकडून पाणीपट्टीच्या केवळ दहा टक्केच आकारणी करावी
डॉ. मेधा खोले प्रकरणी मराठा समाजाने मोर्चा काढावा
मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे
डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुन्यांची शोधमोहीम सुरू करणार

मलकापूर - परदेशी भांडवलदारांना देशात बोलावून शेतकऱ्याला उद्‌ध्वस्त करणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीने ‘चले जाव’ करावे, असा इशारा सरकारला देत नोटाबंदीतून काहीही सापडले नाही, विकास दर कमी झाला, मग कसले ‘अच्छे दिन,’ असा सवाल श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केला.

श्रमिक मुक्ती दलाच्या वार्षिक महामेळाव्यात ते बोलत होते. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘साठ वर्षांत पूर्वीच्या सरकारने काय केले, ते सांगायची गरज नाही. ते नालायक होते म्हणून तुमच्याकडे सत्ता सोपवली. तुम्हीही तसेच निघाला. जलयुक्तचे खड्डे काढून तसेच आहेत. पाणी नाही, दुष्काळ ‘जैसै थे’ आहे. त्यासाठी आलेला कोट्यवधींचा निधी कुठे आहे? विविध मागण्यांसाठी २४ ऑक्‍टोबरपासून सर्व संघटनांना एकत्र करून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे.’’ 

Web Title: maharashtra news dr bharat patankar malkapur