नियोजनबद्ध कटकारस्थानाने दाभोलकर-पानसरेंची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू व ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या नियोजनबद्ध कटकारस्थान करून झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर फरारी आरोपींना एखाद्या विशिष्ट संघटनांचे पाठबळ असल्याचेही उघड होत आहे, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. 

मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू व ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या नियोजनबद्ध कटकारस्थान करून झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर फरारी आरोपींना एखाद्या विशिष्ट संघटनांचे पाठबळ असल्याचेही उघड होत आहे, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. 

दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) व सीबीआयच्या वतीने स्वतंत्र सीलबंद अहवाल दाखल केला. मात्र, या तपासावर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. विभा कनकवाडी यांच्या खंडपीठाने समाधान व्यक्त केले. या अहवालावरून दोन्ही हत्यांमध्ये समानता, एखाद्या विशिष्ट संघटनेकडून आरोपींना आर्थिकदृष्ट्या मदत, समाजामधील काही लोकांचे आरोपींना साह्य आदी मुद्दे स्पष्ट होत आहेत. त्यामुळे आता तपास यंत्रणांनी आणखी वेगळ्या पद्धतीने प्रचलित तपास पद्धती वापरायला हवी, असेही खंडपीठाने सुचविले. आरोपींना पकडणे कठीण असले तरी अशक्‍य नाही, तपास यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधावा, आरोपींच्या बॅंक अकाउंटवर नजर ठेवावी, एटीएमचे व्यवहार पाहावे, रेल्वे नोंदणी, ई-मेल तपासावे, साधारणतः चार ते पाच राज्यांच्या सीमांवरील तपशील घ्यावा, ज्या ठिकाणी आरोपी फरारी होऊ शकतात आदींचा तपास करावा, अशा सूचना न्यायालयाने केल्या. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार विनय पवार व सारंग अकोलकर यांनी दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप आहे. मात्र, ते दोघे देशाबाहेर पळाल्याचा दावा याचिकादारांच्या वतीने करण्यात आला. कर्नाटक सरकारने काही दिवसांपूर्वी दोघेही आरोपी देशाबाहेर गेल्याचे जाहीर केले होते, असे याचिकादारांचे वकील अभय नेवगी यांनी सांगितले. दोन्ही तपास यंत्रणांनी या धर्तीवर तपास करून 13 सप्टेंबर रोजी अहवाल दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. ऍड. नेवगी यांनी याचिकेत एनआयएला प्रतिवादी करण्याची मागणी केली. तसेच तपास होत नसल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी केली. याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. दोन्ही आरोपी गोवा बॉंबस्फोटामध्ये आरोपी असून त्याचा एनआयए तपास करीत आहे. 

सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घ्या 
देशातील 120 कोटी जनता सुरक्षित नाही. सध्याच्या काळात कोणीही दडून राहू शकत नाही. त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही शोध घ्यावा, अशी सूचना न्यायालयाने केली.

Web Title: maharashtra news Dr. Narendra Dabholkar comrade Govind Pansare