आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत कर्जवाटप 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

मुंबई - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत समाजातील युवक आणि युवतींना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहन कर्ज देण्यात येत असून शुक्रवारपासून याला सुरवात झाली आहे. 

पनवेल येथील संदीप कुऱ्हाडे या युवकाला स्वयंरोजगारासाठी नॅशनल को-ऑपरेटिव्ह बॅंकेने दहा लाखांचे बिनव्याजी कर्ज मंजूर केले आहे. या कर्जमंजुरी पत्राचे वितरण आज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक सुचिता भिकाने यांच्या हस्ते देण्यात आले. आतापर्यंत राज्यातून एक हजार 263 बेरोजगारांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगारासाठी नोंदणी केली आहे. 

Web Title: maharashtra news Financial Backward Development Corporation