मातोश्री ग्रामपंचायत योजना राज्यभरात कागदावरच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - ग्रामीण भागाच्या जलद विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला प्रतिसादच मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मुंबई - ग्रामीण भागाच्या जलद विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेला प्रतिसादच मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. आठ महिने उलटल्यानंतरही तिला प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यात 4 हजार 252 ग्रामपंचायतींना इमारती नाहीत, अशा ग्रामपंचायतींना बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेचा फायदा होणार आहे. राज्यात ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदलाचे वारे वाहत असल्याने नव्या सरपंचांच्या नियुक्तीनंतर या योजनेला प्रतिसाद मिळेल, अशी आशा ग्रामविकास कार्यालयातील अधिकारी व्यक्‍त करत आहेत. 

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजना आणि महिला सक्षमीकरण मोहिमेतून ग्रामपंचायतींच्या इमारती बांधणे, जिल्हा परिषद प्रभाग बळकट करणे; तसेच ग्रामपंचायतींच्या नियोजनात महिला संस्थांचा सहभाग वाढविणे आदी बाबींचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागात महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहेत; तसेच गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी "स्मार्टगाव' योजना सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: maharashtra news gram panchayat yojna