पावसाचा कहर सुरूच; राज्यात दहा वीज बळी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - राज्यात पावसाचा कहर सुरूच असून, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मुसळधार तर मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीत तासांत राज्यात वीज पडून दहा जण मृत्युमुखी पडले, तर तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी मराठवाड्यात दोन, जळगावात दोन, बुलडाणा जिल्ह्यात एक आणि ठाणे, रायगड जिल्ह्यांत पाच असे एकूण दहा जणांचे बळी गेले आहेत. 

विजांच्या तांडवाने शनिवारी मराठवाड्यात दहा जणांचा बळी घेतल्यानंतर रविवारी पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी पशुधनही गमावावे लागले आहे. राज्यातील वीज बळींची नावे : रमेश एकनाथ कवडे (वय 60, रा. कण्हेरी शिवार, जि. उस्मानाबाद), अर्जुन गणेश खरात (वय 22, रा. नांजा, जि. जालना), योगेश गणेश पवार (वय 24, रा. गोंडखेल जि. जळगाव), पापालाल सीताराम पवार (वय 55, रा. बोळेतांडा, जि. जळगाव)  सत्यभामा उखर्डा इंगळे (रा. वडनेरभोलजी, जि. बुलडाणा), प्रफुल्ल उमेश कदम (रा. आंबावडे, जि. रायगड), दिलीप शंकर साळवी (रा. कुर्ला, ता. महाड), मंगेश सुरेश मुकणे (वय 23, रा. महापोली, ता. भिवंडी), दीपक कान्हा पाटील (वय 34, रा. राउतपाडा, ता. भिवंडी), स्वप्नील चंद्रकांत घोडविंदे (वय 22, रा. राउतपाडा. ता. भिवंडी). दरम्यान स्वप्नीलचे वडील चंद्रकांत घोडविंदे यांनी मृत्यूविषयी संशय व्यक्त केल्याने त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. 

Web Title: maharashtra news heavy rain ten dead