कर्जमाफीवरून विरोधकांची टोलेबाजी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - कर्जमाफीवरून आज विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर टोलेबाजी केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी हे सरकार वन टाइम सेटलमेंटच्या नावाखाली शेतकऱ्यांकडूनच कर्जाची वसुली करत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली, तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याला काळीमा फासणारी कर्जमाफी असल्याची टीका केली. 

विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपूर्ण व फसवी आहे. कर्जमाफी योजनेचे सध्याचे स्वरूप शेतकऱ्यांना खऱ्याअर्थाने न्याय आणि दिलासा देणारे नाही. त्यामुळे ही कर्जमाफी ऐतिहासिक नसून, राज्याला काळीमा फासणारी असल्याची टीका केली आहे. 

ते म्हणाले की, सरकारला कर्जमाफी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी करायची आहे. त्यामुळे सरकारने अनेक निकष, अटी लागू केल्या आहेत. त्यातच आता ऑनलाइन अर्जाची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. गैरप्रकार रोखण्याच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांप्रती अविश्वास दाखवते आहे. हा शेतकऱ्यांचा अवमान आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल, तर किमान अवमान तरी करू नका, असे बजावून राधाकृष्ण विखे पाटील यांनी ऑनलाइन अर्जाची अट तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. 

""राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अपूर्ण व फसवी आहे. कर्जमाफी योजनेचे सध्याचे स्वरूप शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय आणि दिलासा देणारे नाही. त्यामुळे ही कर्जमाफी ऐतिहासिक नसून, राज्याला काळिमा फासणारी आहे.'' 
राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते

Web Title: maharashtra news Legislative assembly ajit pawar radhakrishna vikhe patil