मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष निवडणूक रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई - मराठी भाषेविषयीचे अनेक मुद्दे अनेक वर्षे नेटाने लावून धरून त्यातील बहुतांशी प्रश्‍न मार्गी लावण्यात मराठी अभ्यास केंद्र यशस्वी झाले आहे; मात्र रिंगणाबाहेरून मराठीच्या आणि एकूणच महाराष्ट्रातील प्रश्‍नांविषयी बोलण्यापेक्षा रिंगणात उतरण्याचा निर्णय केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी घेतला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवणार आहेत. 

महाराष्ट्रात मराठी भाषा विभाग स्थापन होण्यापासून युनिकोडचा प्रसार, एटीएमपासून मोबाईल कंपन्यांच्या आयव्हीआर व्यवस्थेपर्यंत सर्वत्र मराठीचा पर्याय मिळावा, मराठी भाषेच्या प्रश्‍नांसाठी माहितीच्या अधिकाराचे हत्यार, भाषेच्या चळवळीविषयीची अनेक पुस्तके, मराठीत मास मीडियाचा अभ्यासक्रम अशा आघाड्यांवर मराठी अभ्यास केंद्राने काम करून ते प्रश्‍न मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. आता थेट विधिमंडळात जाऊन या प्रश्‍नांना वाचा फोडावी या विचाराने निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. निवडणूक पुढील वर्षी होणार आहे.

Web Title: maharashtra news marathi