एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या 1 लाख 4 हजार कर्मचाऱ्यांना जुलै 2016 पासून प्रलंबित असलेल्या 11 टक्के महागाई भत्त्यासह 2 हजार 500 रुपये आणि अधिकारी वर्गाला 5 हजार रुपये बोनस दिवाळी भेट म्हणून देण्याची घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. 

कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या थकबाकीसह 15 हजार ते 20 हजार रुपये मिळणार असल्याने त्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल, अशी आशा रावते यांनी या वेळी व्यक्त केली. जुलै 2016 ते सप्टेंबर 2017 या 15 महिन्यांचा 7 टक्के थकीत महागाई भत्ता आणि ऑगस्ट 2017 ते सप्टेंबर 2017 या कालावधीतील 4 टक्के प्रलंबित महागाई भत्त्यापोटी 113 कोटी रुपये व सानुग्रह अनुदानापोटी 27 कोटी रुपये, असे एकूण 140 कोटी रुपये तत्काळ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश रावते यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. 

Web Title: maharashtra news MSRTC ST bus employee