एसटीचे पावणेदोन कोटींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दगडफेक करून 168 एसटी बसची मोडतोड केली. एसटीचे एक कोटी 67 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. 

नळदुर्गजवळ उमरगा येथून पुण्याकडे येणाऱ्या शिवशाही बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. त्यात बसच्या खिडकीच्या काचा फुटल्या. औरंगाबाद शहरात 31 एसटी बसची तोडफोड करण्यात आली. मुंबईतील परळ आगारदेखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आले होते. 

पोलिसांच्या परवानगीनेच बस वाहतूक सुरू ठेवावी. प्रवाशांच्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे. बंद कालावधीतील सर्व घटनांची माहिती मध्यवर्ती नियंत्रण कक्षाला द्यावी आदी सूचना राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या विभाग नियंत्रकांना केल्या आहेत. 

एसटी बस तुमच्याच आहेत. कृपया त्यांची दगडफेक करून किंवा जाळपोळ करून सर्वसामान्य माणसांचे दळणवळणाचे हक्काचे साधन हिरावून घेऊ नका, असे भावनिक आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. 

Web Title: maharashtra news MSRTC ST bus koregaon bhima