RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

कायद्यातील नव्या तरतुदींनुसार शाळांना दिलेल्या सवलतींमुळं सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणाला तडा जात असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
RTE admission process in maharashtra
RTE admission process in maharashtraesakal

मुंबई : राज्य सरकारनं राईट टू एज्युकेशन कायद्यांतर्गत अर्थात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शालेय प्रवेशाबाबत केलेल्या नव्या सुधारणेला मुंबई हायकोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळं हे नवे नियम तुर्तास लागू होणार नाहीत. (Maharashtra News Mumbai High Court stays RTE reform the new rules will not apply immediately)

RTE admission process in maharashtra
Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

RTE कायद्यातील सुधारणेबाबत 9 फेब्रुवारी रोजी अधिसूचना राज्य सरकारनं काढली होती. याविरोधात एका सामाजिक संस्थेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर मनसे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा या नियमाला विरोध केला होता. कायद्यातील नव्या तरतुदींनुसार शाळांना दिलेल्या सवलतींमुळं सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणाला तडा जात असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

RTE admission process in maharashtra
ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

काय आहे नवा नियम?

शिक्षण हक्क कायद्यातील नव्या सुधारणेनुसार १ किमीच्या जवळपास खासगी व अनुदानित शाळांमध्ये दुर्बल घटकांतील 25 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सक्ती असणार नाही. या निर्णयामुळं या कायद्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासण्यात आली होती. यामुळं खासगी शाळा दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश देणारच नाहीत, असा आरोप केला जात आहे.

सन 2024-25च्या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेशाची मुदत 10 मेपर्यंत आहे. पण सध्या मुंबई हायकोर्टाच्या या नव्या नियमाला दिलेल्या स्थगितीमुळं कायद्यातील सुधारणा तूर्तास लागू होणार नाही. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com