मुंबईसह पुण्यातील पाच स्थानकांत लागणार डिसेंबरमध्ये सीसी टीव्ही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - एसटी आगार, बसस्थानकात सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त अद्ययावत सुरक्षा यंत्रणेची त्रुटी भरून काढण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसवित येणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला आणि पुणे शहरातील स्वारगेट आणि शिवाजीनगर या स्थानकांवर हे सीसी टीव्ही लावण्यात येणार आहे. 

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी स्थानकांत सीसी टीव्ही बसवणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. मात्र घोषणेला तीन महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. सीसी टीव्ही लावण्याच्या कामासाठी गेल्या महिन्यात निविदा जाहीर झाल्या असून एका खासगी कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले. संपूर्ण स्थानक आणि आगार परिसर सीसी टीव्हीच्या टप्प्यात येईल, अशा पद्धतीने सीसी टीव्हीची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी खासगी कंपनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मुंबई सेंट्रल, कुर्ला आणि परळसह शिवाजी नगर व स्वारगेट स्थानकांवर सीसी टीव्हीची नजर असणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पाच ठिकाणी सीसी टीव्ही सुरू करण्यात येईल. काही ठिकाणी आगार -स्थानकांच्या भिंतीवर सीसी टीव्ही लावण्यात येणार आहे; तर काही ठिकाणी स्वतंत्र पोल उभारून बसवण्यात येणार आहे. एका स्थानकांवर साधारणपणे आठ सीसी टीव्ही लावण्यात येणार आहे. प्रत्येक डेपोत मॉनिटरिंग आणि रेकॉर्डिंग स्वतंत्ररीत्या करण्यात येणार आहे. त्याची देखरेख वरिष्ठ अधिकारी करणार असल्याची माहिती एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली. 

Web Title: maharashtra news mumbai pune cctv