मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर घोषणा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमातील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज मंत्रालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाच्या समोरच्या जागेत अचानक पाच ते सात जणांनी भाजपविरोधी घोषणा देण्यास सुरवात केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस कार्यालयात नव्हते. आंदोलकांनी मुख्यमंत्री कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाला. कार्यालयीन कामकाज संपवून कर्मचारी घरी जात असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. 

Web Title: maharashtra news NCP mantralaya koregaon bhima