जलसंधारणाच्या कामाबाबत कोकणसाठी वेगळे मापदंड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती ही महाराष्ट्रातील इतर विभागांच्या दृष्टीने वेगळी आहे. त्यामुळे कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या विभागासाठी जलसंधारणाच्या उपचारांचे मापदंड तयार करावेत, असे निर्देश मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महाराष्ट्र जलसंधारण कामांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कोकणात झालेल्या कार्यवाहीचा तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा प्रा. शिंदे यांनी घेतला. ते म्हणाले, की कोकणातील जमिनीची पत वेगळी आहे. येथील जमिनीत पाणी मुरत नसल्याने या विभागाच्या जलसंधारणासाठी वेगळी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यातून जलयुक्त शिवारची कामे योग्यरीतीने होऊन पाण्याची क्षमता वाढेल. या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत आदी  उपस्थित होते.

Web Title: maharashtra news ram shinde