एकनाथ खडसेंना योग्य वेळी न्याय देऊ : दानवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

केंद्र सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयानंतरही महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाला मतदान करून दाखवून दिलं की सरकारचे निर्णय बरोबर आहेत. कर्जमाफीवरून विरोधकांची टीका, विरोधकांची ताकद कमी झाली आहे त्यामुळे ते टीका करत आहेत. भाजपा सरकार शेतकऱ्यांसोबतच, केंद्र सरकारकडून याआधीही राज्याला मदत मिळाली आहे, यापुढेही मिळेल, असे दानवे यांनी सांगितले.

मुंबई : आजच्या बैठकीत फक्त संघटनात्मक चर्चा होईल. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा आजच्या बैठकीत होणार नाही. एकनाथ खडसे यांना योग्य वेळी न्याय देऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

आज (गुरुवार) राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून, पुढच्या 8 दिवसांनी जिल्हा आणि पुढील 8 दिवसांनी तालुका कार्यकारिणीच्या बैठका होतील. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपाप्रकरणी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, प्रकाश महेता यांच्यावर आरोप होऊनही त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून क्लीन चीट देण्यात आलेली आहे.

दानवे म्हणाले, की राजकीय प्रस्तावात सरकारने केलेल्या कामांवर चर्चा होते. कृषी विषयक प्रस्तावात कर्जमाफी, दुष्काळाचं सावट यावर चर्चा होईल. कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याबाबत चर्चा होते. या बैठकीत गेल्या तीन महिन्यात पक्ष संघटनेत झालेले काम याचा आढावा घेतला जातो. आगामी काळात केल्या जाणाऱ्या कामांविषयी सूचना दिल्या जातात. भ्रष्टाचार मंत्र्यांवर चर्चा नाही, पक्ष संघटनेत हा विषय होत नाही. महामंडळावरून पक्ष कार्यकर्त्यांत नाराजी नाही. कायद्याला तपासून महामंडळात नियुक्त्या केल्या जातील. योग्य वेळ आल्यानंर चौकशी पूर्ण केल्यानंतर खडसे यांबाबत निर्णय होईल. आत्महत्या रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कर्जमाफीची योजनेची लवकरच अंमलबजावणी होईल. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर सरकार त्याला तोंड देईल आणि आवश्यक उपाययोजना राबवेल.

मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक आपण जिंकूच पण नांदेड महानगरपालिका आणि ग्रामपंचायत यांसह आगामी सर्व निवडणुकाही जिंकू असा विश्वास पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री मेहनत घेतात. तशीच मेहनत कार्यकर्त्यांनी घेऊन जनतेमध्ये विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयानंतरही महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाला मतदान करून दाखवून दिलं की सरकारचे निर्णय बरोबर आहेत. कर्जमाफीवरून विरोधकांची टीका, विरोधकांची ताकद कमी झाली आहे त्यामुळे ते टीका करत आहेत. भाजपा सरकार शेतकऱ्यांसोबतच, केंद्र सरकारकडून याआधीही राज्याला मदत मिळाली आहे, यापुढेही मिळेल, असे दानवे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra news Raosaheb Danve talked about Eknath Khadse