होमगार्ड चालवणार राज्यात एसटी बस 

बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

मुंबई - राज्यभरात दिवाळीच्या सणाच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कोणताही तोडगा निघत नसल्याने आता सरकारने होमगार्डची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एसटी बसचालक व वाहक संपावर असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी होमगार्डना चालक-वाहक करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू झाली आहे. 

आपत्कालीन बंदोबस्त व सार्वजनिक सेवेसाठी होमगार्डची सेवा घेतली जाते. 1946 पासून होमगार्डची सेवा मुंबई प्रांतात तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी सुरू केली. त्या वेळच्या संकल्पनेवर आधारित होमगार्डची मदत आपत्कालीन परिस्थितीत घेता येते. सर्व प्रकारच्या कुशल, परंतु राज्य सरकारच्या सेवेत नसलेल्यांना आपल्या नेहमीच्या कामातून वेळ काढून जनसेवा व सुरक्षेसाठी होमगार्ड म्हणून नेमण्यात आले. 

यंदा पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात या होमगार्डना बस चालवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. 

Web Title: maharashtra news st bus strike Homeguard