गोरक्षक असल्याने तडीपार केल्याचा आरोप बनावट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - गोरक्षक असल्यामुळे नाशिकमधून एका वर्षासाठी तडीपार केल्याचा युवकाचा आरोप हा बनावट असल्याचा दावा राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केला. 

मुंबई - गोरक्षक असल्यामुळे नाशिकमधून एका वर्षासाठी तडीपार केल्याचा युवकाचा आरोप हा बनावट असल्याचा दावा राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केला. 

नाशिकमधील मालेगावमध्ये राहणाऱ्या मच्छिंद्र शिर्के या युवकाने न्यायालयात याबाबतची याचिका केली आहे. त्याला स्थानिक उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एका आदेशाद्वारे तडीपारीचा आदेश दिला आहे. मात्र, गोवंश रक्षणासाठी काम करीत असल्याने मला जाणीवपूर्वक अडकवण्यात येत असल्याचा दावा त्याने याचिकेत केला. याबाबत राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. याचिकादाराच्या दाव्यामध्ये तथ्य नसून, त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये नऊ फिर्यादी गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळेच त्याला तडीपारीचा आदेश दिला आहे, असे या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याची बाजू मांडण्यासाठी युवकाला नोटीस बजावण्यात आली होती; मात्र तो हजर झाला नाही, असेही यामध्ये म्हटले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.

Web Title: maharashtra news state government high court