'शेतीमाल तारण कर्जयोजनेत शंभर बाजार समित्या सहभागी'

'शेतीमाल तारण कर्जयोजनेत शंभर बाजार समित्या सहभागी'

मुंबई - ""शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने शेतीमाल तारण कर्जयोजना सुरू करण्यात आली आहे. शेतीमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतीमालाला गोदाम, तसेच अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत 103 बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या योजनेअंतर्गत चालू वर्षी 86 हजार 166 क्विंटल शेतीमाल बाजार समित्यांनी तारण ठेवला असून, शेतकऱ्यांना मागील फक्त चार महिन्यांत सुमारे कोट्यवधी रुपयांचे तारण कर्ज देण्यात आले आहे,'' अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

सुगीच्या काळात बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतीमाल दाखल होतो. त्याचे भाव पडतात, अशा वेळी शेतकऱ्यांच्या मालाला तारण देणारी ही महत्त्वाकांक्षी अशी योजना असून, यात उर्वरित बाजार समित्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे. शेतकऱ्यांनीही कमी भावाच्या काळात या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले आहे. 

या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोफत गोदाम, गरजेच्या वेळी कर्ज आणि शेतीमालास चांगला भाव मिळण्यास मदत होत आहे. या योजनेत आतापर्यंत 103 बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. 2013 मध्ये ही संख्या फक्त 33 होती. राज्यातील उर्वरित बाजार समित्यांनीही या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात एकूण 307 इतक्‍या बाजार समित्या आहेत. 

...अशी आहे योजना 
या योजनेतून तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भरडधान्य आदीला लाभ दिला जातो. शेतकरी कमी भावाच्या काळात ही उत्पादने बाजार समित्यांकडे तारण ठेवू शकतात. यासाठी त्यांना बाजार समितीमार्फत मोफत गोदाम उपलब्ध करून दिले जाते. तसेच फक्त 75 टक्के इतक्‍या कमी व्याजदरात शेतकऱ्यास शेतीमालाच्या त्या वेळी असलेल्या भावाच्या 6 टक्के रकमेइतके कर्ज लगेच उपलब्ध करून दिले जाते. त्यानंतर वाढीव भावाच्या काळात शेतकरी आपला माल विकू शकतो व कर्जाची परतफेड करून वाढीव रक्कम त्याला परत मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com