'साखर उद्योगाच्या विकेंद्रीकरणाची गरज'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई - साखर उद्योग हा रोजगार व शेती उत्पादकांच्या क्षेत्रातील सर्वांत मोठा व महत्त्वाचा उद्योग असून, संपूर्ण देशभरात या उद्योगाच्या विकेंद्रीकरणाची गरज आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात या उद्योगाला संधी मिळण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे, असे मत केंद्रीय सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आर. सी. चौधरी यांनी आज येथे व्यक्त केले. 

देशातली पहिली साखर व्यापर परिषद परळ येथील आयटीसी ग्रॅंड हॉटेल मध्ये सुरू झाली. अखिल भारतीय साखर व्यापारी संघटनेच्या (अईस्टा) वतीने घेण्यात आलेल्या या तीनदिवसीय परिषदेचे उद्‌घाटन चौधरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या परिषदेतचे उद्‌घाटन होणार होते. मात्र दिल्लीतील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ते उपस्थित राहिले नाहीत. या वेळी "अईस्टा'चे अध्यक्ष प्रफुल्ल विथलानी, वारणा समूहाचे विनय कोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

भारतातील साखर उद्योगाची क्षमता व अपेक्षा यावर या परिषदेत चर्चा होणार आहे. त्यासोबत साखरेची जागतिक मागणी व पुरवठा यातील समस्यांवर भारत, ब्राझील, युरोपीय राष्ट्रे, थायलंड या देशातील तज्ज्ञ भूमिका मांडणार आहेत. 

चौधरी म्हणाले, की देशातील 55 लाख लोकसंख्या थेट साखर उद्योगाशी निगडित आहे. मात्र उसाचे उत्पादन घेणारी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू व गुजरात अशी मोजकीच राज्य आहेत. साखरेच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. तर ग्राहकाच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे. शेतकरी, कामगार, व्यापारी व कारखानदार यांची सर्वाधिक संख्या असणारा हा उद्योग आहे. त्यामुळे ज्या राज्यात ऊस पिकवला जाणार नाही त्या राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यामातून इतर राज्यात प्रक्रिया उद्योग उभारायला हवेत.'' 

चोहोबाजूंनी घेरलेला उद्योग 
वारणा समूहाचे विनय कोरे यांनी साखर हा एकमेव उद्योग चारही बाजूंनी घेरला असल्याची खंत व्यक्‍त केली. सरकारची सततची बदलणारी धोरणे आणि कायमस्वरूपी उपाययोजनांचा अभाव यामुळे साखर उद्योगाच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे कोरे यांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news sugar