उत्पादन वाढूनही साखरेचे भाव वधारणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई -  दोन महिन्यांत साखरेच्या भावात घसरण झाल्यानंतर मागणी वाढल्याने साखरेचे भाव वधारतील, असा अंदाज भारतीय साखर कारखाना संघाने (इस्मा) व्यक्त केला आहे. 

मुंबई -  दोन महिन्यांत साखरेच्या भावात घसरण झाल्यानंतर मागणी वाढल्याने साखरेचे भाव वधारतील, असा अंदाज भारतीय साखर कारखाना संघाने (इस्मा) व्यक्त केला आहे. 

दोन महिन्यांत साखरेचे भाव घसरले होते. मात्र, केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार- उत्तर आणि पश्‍चिम भारतात साखरेच्या भावात 30 ते 100 रुपये प्रतिक्विंटल वाढ दिसून आली आहे. खरेदीदारांच्या उत्साहामुळे साखरेची मागणी वाढल्याचे "इस्मा'ने म्हटले आहे. 1 डिसेंबर 2017 पर्यंत देशभरातील 485 साखर कारखान्यांमध्ये 103.26 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत 81.9 1 लाख टन उत्पादन झाले होते. गेल्या गाळप हंगामापेक्षा या कालावधीतील उत्पादन 26 टक्के अधिक आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे सात लाख व 13 लाख टन अधिक उत्पादन झाले आहे. या दोन राज्यांत हंगामअखेर गतवर्षीच्या तुलनेत अंदाजे 48 लाख टन अधिक उत्पादन अपेक्षित आहे. काही महिन्यांत देशाच्या काही भागांत (उत्तर आणि पश्‍चिम) साखरेच्या भावात सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार- काही भागांमध्ये घाऊक साखरेचा भाव सुधारला आहे, असे "इस्मा'ने आपल्या अहवालात नमूद केले आहे. 

साखर निर्यात आवश्‍यक! 
आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी मंदावून भाव पडल्याने साखर कारखान्यांना निर्यातीतून फारसा नफा मिळत नाही; पण निर्यात झाल्यास देशातील अतिरिक्त साठा कमी होऊन त्याचा फायदा देशांतर्गत साखरेचे भाव वाढण्यावर होऊ शकतो. त्यामुळे निर्यात आवश्‍यक असल्याचे अनेक कारखानदारांचे मत आहे. त्याचवेळी स्थानिक व देशाबाहेरील बाजारपेठांचा दर जवळपासही फिरकत नसल्याने केंद्राने विशेष पॅकेज दिले, तरच साखर निर्यात शक्‍य असल्याचे या उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. 

Web Title: maharashtra news Sugar prices