परराज्यातील ऊसाचे गाळप महाराष्ट्रात नाही 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुंबई - राज्यातील साखर कारखान्याच्या मनमानीमुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस गाळप होत नाहीत. यातील काही साखर कारखान्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करण्याऐवजी राज्याबाहेरील शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करून त्याचे गाळप करण्यात येत असल्याची बाब उघडकीस आल्याने त्याची ठिणगी मंत्रिमंडळ बैठकीत पडली. यावर साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळप करण्यावर बंदी घालण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे समजते. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लातूरचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी केली. त्यावर इतर मंत्र्यांनीही त्यास पाठिंबा देत मागणी केली. मागील दोन वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानही झाले आहे. साहजिक याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला असून अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केलेली आहे. मात्र अनेक साखर कारखाने कार्यक्षेत्र सोडून राज्याबाहेरील ऊस गाळप करत असल्याच्या तक्रारी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे जिल्हा दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी केल्या होत्या. तसेच मराठवाड्यातीलही अनेक शेतकऱ्यांनी अशाच प्रकारच्या तक्रारी निलंगेकर यांच्याकडे केल्या होत्या. कारखान्याच्या या मनमानीला लगाम घालून शेतकऱ्यांचे हित साधले जावे याकरिता कारखान्यानी राज्याबाहेरील ऊस गाळप करू नये असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत निलंगेकर यांनी मांडला होता. या प्रस्तावाला मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी सहमती दर्शवत याबाबत विस्तृत चर्चा केली. या चर्चेअंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्यांनी प्रथम आपआपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाला प्राधान्य द्यावे त्याच बरोबर राज्यातील सर्व उसाचे गाळप केल्यानंतरच राज्याबाहेरील ऊस गाळप करावा असा निर्णय घेतला. 

Web Title: maharashtra news sugarcane sugar factory